पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? नवीन पॅनकार्ड कसे बनवायचे जाणून घ्या | New PAN Card 2.0 Information in Marathi
पॅन कार्ड २.० हे सध्याच्या पॅन कार्डचे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. या पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड दिलेला असेल. त्यामुळे तुमची सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. तसेच नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करु शकतात. पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सरकार करदात्यांना क्यूआर कोडने सुसज्ज नवीन पॅन कार्ड जारी करेल. क्यूआर कोड असलेल्या पॅन कार्डचे वैशिष्ट्ये, यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, नवीन पॅन कार्ड कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया. पॅन कार्ड 2.0 चे उद्दिष्ट पॅन कार्ड 2.0 चे मुख्य उद्दिष्ट सर्व करदात्यांची नोंदणी आणि सेवा सुलभ आणि जलद गतीने करणे हे आहे. तसेच करदात्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे संपूर्ण काम इको फ्रेंडली होणार आहे. कमी खर्चात आणि ऑनलाइन पद्धतीने तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवू शकतात. यामुळे डिजिटल सुविधा अपग्रेड करण्यात आल्या आहे...